पी एम किसान योजना 19 वा हप्ता: पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पाच दिवसांनंतर त्यांच्या खात्यात १९ व्या हप्त्याचे २००० रुपये येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथील एका शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा करणार आहेत. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे.
मागील वेळी 18 वा हप्ता पंतप्रधानांनी 5 ऑक्टोबर रोजी वाशिम येथून जारी केला होता. त्यानंतर 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणारी महत्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आहे. 1 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली होती.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात.
पी एम किसान योजना 19 वा हप्तासाठी केवायसी बंधनकारक
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्राप्त करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. पीएम किसान वेबसाइटच्या मदतीने शेतकरी घरबसल्या स्मार्टफोनवर ई-केवायसी करू शकतात.
पी एम किसान योजना 19 वा हप्ता यासाठी http://pmkisan.gov.in पीएम किसान वेबसाईटवर जावे लागेल. इथे तुम्हाला फार्मर कॉर्नर लिहिलेला दिसेल. त्याखाली ई-केवायसीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. असे केल्याने तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ठरलेल्या ठिकाणी हा ओटीपी भरताच तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

पी एम किसान योजना 19 वा हप्ता लाभार्थ्यांची यादी कशी पहावी
पीएम किसान योजनेच्या (पीएम किसान लाभार्थी यादी) लाभार्थ्यांची यादी ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता मिळणार की नाही, हे शेतकऱ्यांना सहज तपासता येणार आहे. लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया जाणून घेऊया.
- https://pmkisan.gov.in/ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- शेतकरी कॉर्नरवर क्लिक करा.
- एक नवीन पेज ओपन होईल.
- येथे लाभार्थी यादी पर्याय निवडा.
- एक फॉर्म ओपन होईल. यामध्ये आधी राज्याचे नाव निवडा, त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
- सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा.
- असे करताच तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल.
- जर तुमचे नाव यादीत असेल तर तुमच्या खात्यातही पैसे येतील.
डिस्क्लेमर: हा मजकूर न्यूज 18 मधून घेण्यात आला आहे. आम्ही स्पष्टता आणि सादरीकरणासाठी बदल केले आहेत, मूळ सामग्री संबंधित लेखक आणि वेबसाइटची आहे. आम्ही सामग्रीच्या मालकीचा दावा करत नाही.