Dr A P J Abdul Kalam Scholarship for 10th students: अब्दुल कलाम शिष्यवृत्ती योजना

By Sandeep Patekar

Updated on:

Dr A P J Abdul Kalam Scholarship for 10th students
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Dr A P J Abdul Kalam Scholarship for 10th students: पुणे महानगरपालिकेद्वारे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम शिष्यवृत्ती योजना आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजना या केवळ पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या रहिवाशांसाठी लागू आहेत.

पुणे महानगरपालिका दरवर्षी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम शिष्यवृत्ती योजना (abdul kalam yojana) आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मदत करते.

Dr A P J Abdul Kalam Scholarship for 10th students

चालू वर्षी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम शैक्षणिक (Abdul kalam scholarship for 10th students) योजनेअंतर्गत 15,000 रु.ची एक वेळची शिष्यवृत्ती मिळेल.

त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजनेतर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २५,000 रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

APJ Abdul kalam scholarship Eligibility

APJ Abdul kalam scholarship या योजने साठी कोण अर्ज करू शकणार आणि त्या साठी काय काय पात्रता आहे ते आपण पाहूया.

  • विद्यार्थी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील असावा.
  • विद्यार्थ्याने चालू वर्षात एसएससी किंवा एचएससी परीक्षेत किमान 80% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी मागासप्रवर्गातील असल्यास किंवा पुणे महानगरपालिकेच्या नियमित/रात्रशाळेत शिकलेला असल्यास त्याला किमान ७० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी ४० टक्के अपंग असल्यास किमान टक्केवारी ६५ टक्के असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याने पुढील चालू शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेत अगोदर अर्ज केलेला असावा.
Dr A P J Abdul Kalam Scholarship For 10Th Students

Abdul Kalam Yojana Scholarship documents required

Abdul Kalam Scholarship documents ची लिस्ट खालील प्रमाणे दिलेली आहे.

  • १) रेशनिंग कार्डची पहिले व शेवटचे पान अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
  • २) कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा यांपैकी आवश्यक.
  • (३) अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक.
  • ४) वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
  • ५) मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला आवश्यक राहील.
  • ६) बोर्ड मार्कशीट तसेच CBSE & ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळेचे टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.

Abdul kalam scholarship for 10th students: अर्ज कसा करावा

Abdul kalam scholarship हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरीता सूचना खालीलप्रमाणे.

  • १) लाभार्थ्याने यापूर्वी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केले असल्यास त्याच user id व password ने अर्ज भरावा. नवीन लाभार्थ्यांनी नविन रजिस्ट्रेशन करून user id व password च्या आधारे अर्ज भरावा.
  • २) मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांनी मागासवर्गीय कल्याणकारी शिष्यवृत्ती योजना व खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी युवक कल्याणकारी शिष्यवृत्ती योजने अंतर्गत वेगवेळ्या गटात अर्ज भरणे आवश्यक आहे.
  • ३) अर्ज पालकांच्या नावे भरणे आहे.
  • ४) वेबसाइट वर नमूद केलेल्या अटी व शर्ती नुसार मूळ कागदपत्रे स्कॅन करूनच अपलोड करणे आवश्यक आहे. जेणेकरून अर्ज बाद होणार नाही.
  • ५) dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेबाबतचा नमुना (हमीपत्र) उपलब्ध करून देणेत आला आहे. त्यानुसार माहिती पालक व महाविद्यालयांनी भरल्यानंतरच सदरचे हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
  • ६) लाभार्थी CBSE/ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळा / महाविद्यालयाकडून टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
  • ७) शैक्षणिक अर्थसहाय्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.
  • ८) नियम व अटीप्रमाणे भरलेल्या अर्जांचा विचार येथे केला जाईल. तसेच बाद करण्यात आलेल्या अर्जाबाबत अर्जदाराने दिलेल्या मुदतीमध्ये आक्षेप पुर्तता केल्यास सदर अर्जावर पुढील कार्यवाही केली जाऊ शकते. मुदतीमध्ये आक्षेप पुर्तता न केल्यास अर्ज पूर्णपणे रद्द करण्यात येईल.
  • ९) अर्ज भरताना अर्जदाराने Abdul kalam scholarship हा अर्ज save as draft करून ठेवल्यास व अर्ज सादर न केल्यास अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही. या बाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची राहिल.
  • १०) अर्जदाराने Abdul Kalam scholarship चा अर्ज सादर केल्यानंतर अर्जाबाबतची स्थिती लॉगिनद्वारे जाणून घेण्याची जबाबदारी नागरिकांची राहील.

Dr A P J Abdul kalam scholarship साठी विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाइन येथे भरावेत dbt.pmc.gov.in आणि भरलेल्या अर्जाची प्रिंट-आउट सबमिट करा. आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅन करून सोबत अपलोड करावीत.

Abdul Kalam Yojana अर्ज भरण्याची कालावधी दि. 08 ऑगस्ट 2024 ते 30 सेप्टेंबर 2024 पर्यन्त असेल.

APJ Abdul Kalam Scholarship Terms

APJ Abdul Kalam scholarship च्या अटी व नियम सविस्तर पणे पाहुयात.

  • इयत्ता १० वी इयत्त १२ वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याना ८०% पेक्षा जास्त गुण, पुणे महानगरपालिकेच्या शाळेत अथवा रात्र शालेत शिकत असलेले विध्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विध्यार्थी यांना ७०% पेक्षा जास्त गुण, ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५% तसेच कचरा वेचक / बायोगॅस प्रकल्पावर काम करणारा / कचऱ्याशी संबंधित काम करणारा असंघटीत कष्टकरी कामगार यांचे पाल्यास ६५% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी लाभासाठी पात्र ठरतील.
  • महाविद्यालय प्रवेश शुल्क पावती जोडणे आवश्यक. शिफारस अर्जा मधील सर्व रकाने भरून स्कॅनिंग करून अर्जासोबत अपलोड करावेत.
  • दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्म झालेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या २ पेक्षा जास्त असल्यास APJ Abdul Kalam Scholarship योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • इयत्ता १० वी किंवा इयत्ता १२ वी नंतर शासनमान्य वा विद्यापीठ मान्य संस्थेत कुठल्याही शाखेत प्रवेश घेतला असल्यास अर्थसहाय्य देण्यात येईल.
  • पुणे महानगरपालिका अर्थसंकल्पातील उपलब्ध तरतुदीपेक्षा एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास अर्जदारांना समान रक्कम किंवा इयत्ता १० वी कमाल रक्कम रु.१५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल व इयत्ता १२ वी कमाल रक्कम रु.२५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल..
  • scholarship Abdul kalam करिता मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अर्जासोबत अपलोड करावेत.
  • उपलब्ध आर्थिक तरतूद व सादर नियम व अटींचा विचार करून अर्जदाराचा अर्ज नाकारण्याचा वा स्वीकारण्याचा अधिकार पूर्णपणे मा. मुख्य समाज विकास अधिकारी, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा APJ Abdul kalam scholarship या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.

Dr APJ Abdul kalam scholarship contact Details

Dr APJ Abdul kalam scholarship च्या अधिक माहितीसाठी 18001030222 या टोल फ्री नंबर वर कॉल करा.

Dr APJ Abdul kalam scholarship योजने बाबतचा संपुर्ण तपशील तसेच अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

तसेच अधिक माहिती हवी असल्यास पुणे महानगरपालिकेच्या संबंधित कार्यालयामध्ये असलेल्या समाज विभागाकडील कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधावा.

Dr A P J Abdul kalam scholarship साठी विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाइन येथे भरावेत dbt.pmc.gov.in आणि भरलेल्या अर्जाची प्रिंट-आउट सबमिट करा. आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅन करून सोबत अपलोड करावीत.

FAQs on Scholarship Abdul Kalam

मौलाना अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४ काय आहे?

मौलाना अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४ अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चालू वर्षी 10 वी (SSC) किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम शैक्षणिक (Abdul kalam scholarship for 10th students) योजनेअंतर्गत 15,000 रु.ची एक वेळची शिष्यवृत्ती मिळेल.

अब्दुल कलाम शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा?

विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाइन येथे भरावेत dbt.pmc.gov.in आणि भरलेल्या अर्जाची प्रिंट-आउट सबमिट करा. आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅन करून सोबत अपलोड करावीत.

एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे?

विद्यार्थ्याने चालू वर्षात एसएससी किंवा एचएससी परीक्षेत किमान 80% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.


Leave a Comment