Ladki Bahin Yojana eKYC: महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. गेल्या वर्षभरात पात्र महिलांच्या खात्यात 18 हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. मात्र या योजनेत काही अपात्र लोक जसे की पुरुष आणि सरकारी कर्मचारी घुसले असल्याचे उघड झाले आहे.
e-KYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
Ladki Bahin Yojna ई-केवायसी न केल्यास लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये मिळणार नाहीतनेमके बदल काय ? कशी आणि कुठे कराल E-KYC ?
या घुसखोरीला लगाम घालण्यासाठी आणि योजनेची पारदर्शकता वाढवण्यासाठी आता प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा मासिक हप्ता तुमच्या खात्यात नियमितपणे जमा व्हावा यासाठी Ladki Bahin Yojna eKYC ची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.

या प्रक्रियेसाठी तुम्हाला खालील कागदपत्रे तयार ठेवावी लागतील.
Ladki Bahin Yojana eKYC साठी आवश्यक कागदपत्रे :
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवाशी दाखला, रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे सिद्ध करण्यासाठी)
- बँक खात्याची सविस्तर माहिती (खाते क्रमांक आणि IFSC कोड)
- नमूद केलेली इतर कागदपत्रे
Ladki Bahin Yojna ई-केवायसी करण्याची सोपी प्रक्रिया :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे, जेणेकरून सणासुदीच्या दिवसांत त्यांना घाई होणार नाही. तरीही, पुढील हप्ता थांबू नये यासाठी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही ही प्रक्रिया सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in वर किंवा ई-महासेवा केंद्रांवर जाऊन पूर्ण करू शकता.
सर्वप्रथम सरकारच्या वेबसाइटवर जाऊन Ladki Bahin Yojna ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा. तेथे तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक अचूक नोंदवा. मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर, कागदपत्रे व्यवस्थित जमा झाल्याची खात्री करा. मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने ही मुदत दिली असली तरी सर्व पात्र महिलांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये.