Apply For RTE Admission Maharashtra 2026 अर्ज प्रक्रिया संपूर्ण मार्गदर्शन

स्थिती New
Apply For Rte Admission Maharashtra 2026 अर्ज प्रक्रिया संपूर्ण मार्गदर्शन
Advertisement
Table of Contents

Apply For RTE Admission Maharashtra 2026 अंतर्गत विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये 25% राखीव कोट्यातून मोफत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. RTE Maharashtra साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असून पालक घरबसल्या अधिकृत पोर्टलवरून अर्ज करू शकतात. खाली RTE maharashtra 2026 अर्ज प्रक्रिया सविस्तर दिली आहे.

Step 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या

सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत RTE पोर्टलला भेट द्या.

👉 student.maharashtra.gov.in

या वेबसाइटवर RTE Admission विभागामध्ये अर्ज प्रक्रिया उपलब्ध असते.

Step 2: नवीन नोंदणी (New Registration)

वेबसाइट उघडल्यानंतर खालील प्रक्रिया करा:

  • “RTE 25% Admission” पर्याय निवडा
  • “New Registration” किंवा “नवीन नोंदणी” वर क्लिक करा
  • पालकांचा मोबाइल नंबर टाका
  • OTP द्वारे मोबाइल नंबर पडताळणी करा

यामुळे तुमचे RTE पोर्टलवर खाते तयार होते.

Step 3: विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती भरा

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज फॉर्म उघडेल. त्यामध्ये विद्यार्थ्याची माहिती भरावी लागते.

भरण्याची माहिती:

  • विद्यार्थ्याचे पूर्ण नाव
  • जन्मतारीख
  • लिंग
  • पालकांचे नाव (आईचे व वाडीलचे संपूर्ण नाव)
  • पत्ता
  • आधार क्रमांक
  • राहत्या घराचे लोकेशन

सर्व माहिती योग्य भरली आहे याची खात्री करा.

Step 4: कागदपत्रे अपलोड करा

RTE maharashtra 2026 अर्जासाठी काही महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

सामान्यतः आवश्यक कागदपत्रे:

  • जन्म प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखला / सॅलरी स्लिप
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)

कागदपत्रे स्कॅन करून PDF किंवा JPG स्वरूपात अपलोड करा.

Step 5: शाळांची निवड करा

या टप्प्यावर पालकांना आपल्या परिसरातील शाळांची निवड करावी लागते.

महत्वाच्या बाबी:

  • 1 किमी अंतरा जवळच्या शाळा निवडा
  • पोर्टलवर उपलब्ध शाळांची यादी पाहा
  • अनेक शाळा निवडण्याचा पर्याय असतो

जास्तीत जास्त शाळा निवडाव्या, जास्त शाळा निवडल्यास प्रवेशाची शक्यता वाढते.

Step 6: अर्ज तपासणी (Preview)

अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा तपासा.

तपासण्याच्या बाबी:

  • विद्यार्थ्याचे नाव
  • जन्मतारीख
  • कागदपत्रे
  • निवडलेल्या शाळा

चुकीची माहिती असल्यास लगेच दुरुस्ती करा.

Step 7: अर्ज सबमिट करा

सर्व माहिती योग्य असल्यास “Submit Application” बटणावर क्लिक करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर:

  • अर्ज क्रमांक (Application ID) मिळतो
  • SMS द्वारे पुष्टीकरण मिळते
  • अर्जाची PDF कॉपी डाउनलोड करता येते

हा अर्ज क्रमांक भविष्यातील प्रक्रियेसाठी खूप महत्वाचा असतो.

Step 8: अर्ज प्रिंट घ्या

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे.

याचा उपयोग:

  • दस्तऐवज पडताळणी
  • प्रवेश प्रक्रियेदरम्यान
  • शाळेत दाखवण्यासाठी

Step 9: लॉटरी निकाल तपासा

rte maharashtra 2026 साठी विद्यार्थ्यांची निवड केंद्रीकृत ऑनलाइन लॉटरी प्रणाली द्वारे केली जाते.

निकाल कसा पाहायचा:

  • RTE पोर्टलला भेट द्या
  • Application ID टाका
  • निवड झाली आहे का ते तपासा

निवड झाल्यास पालकांना SMS द्वारे सूचना मिळते.

Apply For RTE Admission साठी अर्ज करताना महत्वाच्या सूचना

पालकांनी खालील बाबी लक्षात ठेवाव्यात:

  • अर्ज अंतिम तारखेपूर्वी पूर्ण करा
  • सर्व कागदपत्रे स्पष्ट अपलोड करा
  • योग्य मोबाइल नंबर वापरा
  • अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अर्जाची अंतिम तारीख 18 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र अंतिम मुदत पुन्हा वाढवली जाण्याची शक्यता कमी असल्याने अर्ज त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे.

मोठी खुशखबर! RTE Maharashtra 2026 अर्जाची अंतिम तारीख वाढली – आता 18 मार्चपर्यंत संधी

अशा सरकारी योजना, शिक्षण आणि महत्वाच्या अपडेट्ससाठी Marathicon.com ला भेट देत राहा.

Advertisement
Sandeep

Author

Sandeep

Sandeep Patekar is a Professional SEO Expert and experienced Career Counselor with 5 years of experience in the educational field.

Advertisement